चांदणी चौकात उभारलेला मुरलीधर मोहोळ यांचा भव्य कट आऊट घेतोय सर्वांचे लक्ष वेधून..
कोथरूड : पुणे लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यातच मोहोळ यांचा आता केंद्रीय मंत्री मंडळातही समावेश झाला आहे. सध्या मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी चांदणी चौकात लावण्यात आलेल्या भव्य कटी आऊटची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
चांदणी चौकात पौड रस्त्यावर लोहिया जैन आय टी पार्क समोर पौड. 70 फूट उंच आणि 20 फूट रुंदीचा भव्य कट आऊट उभा करून खासदार मुरलीधर मोहोळ यांना माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोथरूड मध्ये प्रवेश करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचा हा भव्य कट आऊट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या पुण्यात सर्वत्र भाजप पदाधिकारी व मित्र परिवाराकडून खासदार झाल्याबद्दल मोहोळ यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. शहराच्या पश्चिम प्रवेश द्वारावर लावलेल्या या कट आऊट सध्या चर्चेत आहे.
खासदार झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची लगेच केंद्रीय राज्य मंत्री पदी निवड झाली असून त्यांना आजच सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री पदाचा कार्यभार मिळाला आहे. त्यामुळे पुणे शहरातून त्यांच्यावर आधी खासदार झाल्याच्या शुभेच्छा तर आता मंत्री पदाच्या शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.