पुणे शहर

कोरोना विरूद्धच्या लढाईत सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता : दिलीप बराटे

वारजे : ‘कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे.लघुउद्योग क्षेत्रात भितीचे वातावरण आहे. लाॅकडाऊनमुळे कष्टकरी बेराजगार झाले आहेत. कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रातून परप्रांतीय कामगार मूळ गावाला जात आहेत. कोरोनाविरूद्ध सरकारबरोबर आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून आरोग्य सेवा सुधारली तर या संकटावर आपण लवकरच मात करू.कोरोनाच्या महामारीविरूद्ध लढण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित कलावंत,उद्योजक,खेळाडू इ..नी  मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे विचार माजी उपमहापौर , नगरसेवक दिलीप बराटे यांनी व्यक्त केले. The need for a collective effort in the fight against Corona: Dilip Barate

संस्कार मंदिर महाविद्यालय,वारजे-माळवाडी,पुणे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘कोविड १९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. भारतभरातून १६० अभ्यासक या ऑनलाईन चर्चासत्रासाठी उपस्थित होते.सदर चर्चासत्राचे उद्दघाटन संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या हस्ते झाले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र थोरात यांनी धर्मस्थळांपेक्षा हाॅस्पीटल उभारणे कसे आवश्यक आहे याविषयी भाष्य केले. ऑनलाईन चर्चासत्राचे मुख्य संयोजक डाॅ दिपक शिंदे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.

राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे बीजभाषणातून शिवाजी विद्यापीठातातील डाॅ. प्रकाश कांबळे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांनी कोविडचे भारतीय विकासावरील परिणाम या विषयावर विवेचन केले. सदर ऑनलाईन चर्चासत्रासाठी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, आसाम येथील तज्ज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. डाॅ अनिल वावरे यांनी ‘कोविडचे भारतातील रोजगारावर परिणाम’ या विषयावर तर डाॅ वीणा ठवरे यांनी ‘कोविडचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ लक्ष्मण लाल साळवी यांनी कोविडचे मागणी बाजू व पुरवठा बाजू परिणाम ‘ या विषयावर तर डाॅ विजय पवार यांनी ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आरोग्य व्यवस्थेचे मजबूतीकरण’ या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले.

IMG 20210430 WA0001

ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रासाठी भारतभरातून १६० प्राध्यापक उपस्थित होते तर ४८ प्राध्यापकांनी संशोधनपर शोधनिबंध पाठवले आहेत. हे संशोधन पेपर अजंता या यु.जी.सी यादीतील प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध केले जाणार आहेत. या राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे समन्वयक डाॅ दिपक शिंदे होते. याप्रसंगी संस्कार मंदिर संस्थेचे सचिव विशाल थोरात, खजिनदार अविनाश जाधव, चर्चासत्राचे सहसमन्वयक डाॅ संजय गिरी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ देवेंद्र भावे यांनी तर आभारप्रदर्शन डाॅ दिपक शिंदे यांनी केले. डाॅ विजय पवार यांचे चर्चा सत्रास सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये