पुणे शहर

वारजेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन..

वारजे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने वारजे येथील मॅजेस्टिक हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रक्ताचा तुटवडा असल्याने पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Blood donation camp organized by NCP in Warje ..

पी एस आय ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.  पुढील काही दिवसांत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस घेता येणार आहे. लस
घेतल्यानंतर ६० दिवस रक्त देता येणार नाही. त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

IMG 20210430 WA0001

यावेळी पुणे शहर उपनिबंधक राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, निवृत्ती येनपुरे, अनिल गायकवाड, महादेव गायकवाड, सुरेश जाधव, सुरेश सपकाळ, धनंजय म्हसे, अरूण पाटील, मनिष धुमाळ, मोहित वेलाणी, निलेश धानापुने आदी उपस्थित होते. शिबिराचे  संयोजन  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष वारजे व मनिष धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close