कोथरुडपुणे शहर

एका महिन्यातच केलेला रस्ता उखडला ; कोथरूड मधील सुतारदरा येथील प्रकार : कारवाई करण्याची मनसेची मागणी

कोथरूड : काही दिवसांपूर्वीच शिवतीर्थनगर ते राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र पावसाला अजून नीट सुरवातही झाली नसताना रिमझिम पावसाने रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबधित बेजबाबदार अधिकारी तसेच निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात मनसे शाखा अध्यक्ष किरण उभे यांच्याकडून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

उभे यांनी सांगितले की, शिवतीर्थनगर ते राजमाता जिजाऊनगर ( सुतारदरा) या ठिकाणी एक महिन्यापूर्वीच नवीन डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तुरळक पावसात रस्त्याची ही अवस्था झाल्याने रस्त्याचे काम काय दर्जाचे करण्यात आले आहे हे दिसून येत आहे. केवळ करायचे म्हणून काम करून नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी केली गेली आहे.

या प्रकरणात रस्त्याची तपासणी करणारा संबंधित खात्याचा अधिकारी ( JE ) आणि ठेकेदारावर करवाई करण्याची मागणी उभे यांनी केली आहे. सदर ठिकाणी खराब रस्त्याची लवकरात लवकर पाहणी करुन उच्च दर्जाचा रस्ता तयार करावा. अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळण करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारा विरोधत मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा उभे यांनी दिला आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये