महाराष्ट्र
सुप्रीम कोर्टात अखेर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्ष संदर्भात आज सुनावणी होणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज अखेर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दुपारी साडे बारा वाजता ही सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण वारंवार लांबणीवर जात असल्याने आज उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी तातडीने मेन्शन केल. त्यानंतर कोर्टाने आजच्याच कामकाजामध्ये समाविष्ट केलं आहे. या प्रकरणावर आज निर्णय होण्याची अपेक्षा शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.
आता या प्रकरणाचा निकाल लागणार की न्या.रमण्णांच्या निवृत्तीआधी प्रकरण घटनापीठाकडे जाणार? याचे उत्तर आजच्या सुनावणीत मिळण्याची शक्यता आहे.




