पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी : मंजुश्री खर्डेकर.

कोथरुड : pune city, Kothrud भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना होणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 105 व्या जयंतीच्या निमित्ताने एरंडवणा येथील महापालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय मॉडेल शाळा क्र.74 येथील प्रयोगशील शिक्षक श्रीकांत देवकर यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण करून आयोजित केलेल्या प्रश्न मंजुषेचे खर्डेकर यांनी कौतुक केले.
यावेळी नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, बूथ प्रमुख कुलदीप सावळेकर, प्रभाग 13 चे अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस दीपक पवार, महिला मोर्चा सरचिटणीस केतकी कुलकर्णी, जयश्री घाटे, सुधीर फाटक, सतीश मोहिते, मराठी माध्यमाच्या प्रभारी मुख्याध्यापक शशिकला चव्हाण, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापक एलिझाबेथ काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांत देवकर ह्या उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक असून कोरोना काळात देखील ऑनलाईन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अवांतर विषयात व्यस्त ठेवण्याचे काम ते करतात असे सांगतानाच यापूर्वी देवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांच्या संदर्भात अश्या प्रश्नमंजुषा आयोजित केल्या असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप ही करण्यात आले.पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय ही कल्पना मांडली व शेवटच्या व्यक्ती पर्यंत विकास पोहोचला पाहिजे यासाठी ते आजीवन कार्यरत होते असे नगरसेवक जयंत भावे म्हणाले. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे व मिताली सावळेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.शशिकला चव्हाण यांनी स्वागत केले तर श्रीकांत देवकर यांनी ऑनलाईन स्पर्धेचे सादरीकरण केले.



