कोथरुड

स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानकडून रसाळगडावर संवर्धनाचे काम सुरू

पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती.

कर्वेनगर : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानकडून अनेक वर्षांपासून गड किल्ले संवर्धनाचे काम सुरू आहे. नुकतेच प्रतिष्ठान च्या सदस्यांनी रसाळगडावर संवर्धनाचे काम करताना तेथील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. यामध्ये सुरवातीला रसाळगडावरील  एका पाण्याच्या टाक्याची  स्वच्छता करण्यात आली आहे. .

गेली अनेक वर्षे रसाळगडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये  मोठ्या प्रमाणात माती वाहुन आल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढून या टाक्या आता प्रतिष्ठान कडून स्वच्छ करण्यात येत आहेत.  गडावर आठ पेक्षाही जास्त टाक्या आहेत.  टप्प्या टप्पाने सर्व टाक्या स्वच्छ करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रतिष्ठानच्या देण्यात आली.

यावेळी मोहिमेत प्रतिष्ठानचे सदस्यांमध्ये सुयोग चव्हाण, रामचंद्र पेंढारी, प्रज्योत भोईर, बालु ताम्हणकर, आदित्य कळंबटे, यश शिगवण, सार्थक कळंबटे, सुजल शिगवण, सिध्देश कदम, अभिनीत कळंबटे, ओंकार कळंबटे, यश कळंबटे, साहिल चव्हाण, समीर उतेकर, रोहित कळंबटे, सुमित कळंबटे, शुभम कळंबटे, संदेश कळंबटे यांनी सहभाग दर्शवला.

Img 20200930 wa0088

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये