स्वच्छ बावधन संकल्पनेतून एलएमडी गार्डन येथे केलेले इ- टॉयलेट पुन्हा सुरू – नगरसेवक दिलीप वेडे पाटील

बावधन : एल.एम.डी. गार्डन येथे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या महापालिकेच्या विकास निधीतून बनवण्यात आलेले इ- टॉयलेट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. स्वच्छ बावधन संकल्पनेतून बनवण्यात आलेले हे इ- टॉयलेट कोरोनामुळे बंद स्थितीत होते. E-toilet reopened at LMD Garden under Swachh Bawadhan concept – Corporator Dilip Vede Patil
मागील वर्षी लॉकडाऊनपूर्वी एल.एम.डी. चौक परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पाठपुराव्यातून महिला,पुरूष व लहान मुले सर्वांकरिता एल.एम.डी. गार्डन येथे इ-टॉयलेट उभारण्यात आले. परंतु सदर स्वच्छतागृहाचा कोरोना काळात वापर न झाल्याने सदर इ- टॉयलेट निष्क्रिय स्थितीमध्ये होते.
याबाबतीत नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून कायमस्वरूपी या स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी यासाठी निधी उपलब्ध करून घेतल्याने पुन्हा हे स्वच्छतागृह कार्यरत करण्यात आले आहे. सदर इ-टॉयलेट चा वापर करा व आपले बावधन स्वच्छ व निरोगी ठेवा. असे आवाहन करण्यात आले आहे.




