मोदी सरकारची ७ वी वर्षपूर्ती व नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन..

कोथरुड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्ती निमित्त व नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमात ईएमएफ क्लिनिक्स यांच्या विद्यमाने नागरिकांकरीता मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले. तसेच कोविड महामारीमध्ये नागरिकांसाठी सेवारूपी कार्य बजावणाऱ्या रिक्षा चालक कोविड योद्धांचा यावेळी सन्मान करण्यात आला. Service week program on the occasion of 7th anniversary of Modi government and birthday of corporator Dilip Vedepatil

कोरोंनाच्या महामारीत समाजातील विविध घटक अडचणीत आले असल्याने त्यांना मदतीचा हात म्हणून दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका प्रभाग क्रं.10 मधील सर्व रिक्षा व टेंम्पोचालक, केस कर्तनालयातील कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते, सफाई कर्मचारी, तृतीय पंथीय नागरिकांना अन्नधान्य किट, ईम्युनिटी बुस्टर आयुर्वेदिक काढा मोफत स्वरुपात वाटप करण्याचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते करण्यात आला.



प्रभागातील घरेलू काम करणाऱ्या महिलांना राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या. 1500 रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेता यावा याकरिता नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून घरेलू कामगार नोंदणी अभियानाची सुरुवात भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक व खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव आण्णा तापकिर यांच्या हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी चंद्र्कांत पाटील म्हणाले की, एखाद्या विषयाचा बारीक अभ्यास करून परिसराच्या विकासासाठी प्रशसनाकडे कायम पाठपुरावा करणारे अभ्यासू नगरसेवक अशी दिलीप वेडेपाटील यांची पुणे महानगरपालिकेत ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नगरसेवक तळागाळात प्रत्येक गरजू नगरीकांपर्यंत पोहचून या महामारीच्या काळात आपले कार्य बजावित असताना ठाकरे सरकार संपूर्णपणे झोपलेले दिसत आहे.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना गणेश वरपे, श्रद्धा-प्रभुणे पाठक, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ, वैभव मुरकुटे, व सागर कडू, कैलास मोहोळ, प्रदीप जोरी, अजित शिगवन, रूपेश भोसले, राजेश कुलकर्णी, बंडू भंडारी,पवन सतदेवे, निधि भाटीया, अपर्णा गोरे, अविनाश मुगळीकर, प्रियदर्शन करंजकर, ईएमएफ क्लिनिकचे डॉ.केदार कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले व आभार शैलेश वेडेपाटील यांनी मानले.
घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये गुडघेदुखी, पाठदुखी,सांधेदुखी व संधीवताची लक्षणे,मानदुखी व मणक्यातील गॅप, त्याचबरोबर इसीजी (ECG)तपासणी करण्यात आली. या प्रसंगी इमुनिटी बुस्टर इएमएमफ काड्याचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाच्या भयंकर महामारीमध्ये नागरिकांसाठी सेवारूपी कार्य बजावणाऱ्या रिक्षा चालक कोविड योद्धांचा सन्मान करून त्यांना नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी शिबीर 1 जून ते 10 जून पर्यंत सुरू राहणार आहे.



