कोथरूडमधील महेश विद्यालयात विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत ; पहा व्हिडिओ

कोथरुड : pune city, Kothrud कोथरूड मधील श्रीकांत ठाकरे रस्त्यावरील महेश विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे पारंपारिक वाद्याच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पारंपारिक वेश परिधान करून शाळेमध्ये आले होते. Traditional welcome of students at Mahesh Vidyalaya in Kothrud
माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी थोर समाजसुधारकांचे तसेच भारतीय लष्कराचे वेश परिधान करून विद्यार्थी शाळेमध्ये आले होते. दीड वर्षाच्या कालावधीनंतर आज शाळा पुन्हा सुरू झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यावेळी उपस्थित होता.
कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे असे सांगत राजेंद्र गोरडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




