शाडुच्या मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण श्रीमानयोगी प्रतिष्ठानकडून संपन्न
पुणे : बाळगोपाळानां शाडुच्या मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण यंदाही श्रीमानयोगी प्रतिष्ठान व महेश बालभवन यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते.
प्लास्टर पॅरीसच्या मुर्तींमध्ये पर्यावरणाला हानी पोहचु शकेल अशा केमिकल मिश्रीत रंगाचा वापर होत असतो, त्याचबरोबर या गणेश मुर्तींचे विसर्जन केल्यावर विघटन होत नाही ही सर्वात मोठी समस्या असते यामुळे शाडुच्या मातीच्या गणेश मुर्तींचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी श्रीमानयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या संकल्पनेतून दरवर्षी बाळगोपाळांना शाडुच्या मातीपासून सुबक गणेश मुर्ती घडविण्याचे मोफत प्रशिक्षण तज्ञ कारागिराकडुन महेश बालभवन यांच्या सहकार्यातून महेश विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केले होते.
गणेश मुर्ती प्रशिक्षण शिबीरास बाळगोपाळांकडुन उदंड प्रतिसाद मिळाला 500 बाळगोपाळांनी या कार्यशाळेत सहभागी होत सुबक गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.