कोथरुड

सृष्टी फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण..

कोथरुड : pune city जागतिक पर्यावरण दिन निमित्त सृष्टी फाउंडेशन व पुणे मनपा वृक्ष प्राधिकरणच्या वतीने नळस्टॉप चौक ते भैरवनाथ मंदिर म्हात्रे पूल दरम्यान स्थानिक जातीच्या बहावा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सृष्टी फाउंडेशनच्या वतीने सलग सात वर्षे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे. आज लावण्यात आलेल्या बहवा वृक्षांमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक सृष्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सभासद संदीप मोकाटे यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमास माजी नगरसेवक शिवा मंत्री, डॉ मदन कोठुळे, गोविंद थरकुडे, उद्यान विभागाचे विलास आटोळे, समीर कुराडे, मधुकर मोहिते, दत्ता जाधव, विशाल भेलके, अजय भुवड, शारदा विर, शिवाजी मारणे, अशोक माने, सचिन पवार, दिनेश पेंढारे, श्याम पवार, सोमनाथ मोहिते, नागेश चव्हाण, संतोष चव्हाण, अक्षय नाटमे, ऋतिक पवार, प्रणव मोकाटे, ओम मोकाटे, सोजल पवार, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन फाऊंडेशनचे सचिव वृषभ मोकाटे यांनी केले होते.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये