शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक उत्तम भेलके यांचे पुत्र उदय भेलके यांचा शिवसेनेत प्रवेश; कोथरूड मतदार संघाच्या विभागप्रमुखपदी नियुक्ती
पुणे : शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक उत्तम भेलके यांचे चिरंजीव आणि सामाजिक कार्यकर्ते उदय उत्तम भेलके यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात आला आहे.उदय भेलके यांच्या प्रवेशाने कोथरूड भागामध्ये शिवसेनेला मोठी बळकटी मिळणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठी माणसाच्या त्याच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे सांगत उदय भेलके यांनी युवासेनेचे सचिव किरण साळी यांच्या उपस्थित शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी त्यांना कोथरूड विधानसभा मतदार संघाची विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विकासाचे कार्य करत आहेत ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी त्यांना किरण साळी यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन थोरात आणि उदय भेलके यांचे सहकारी उपस्थित होते.