राजाभाऊ जोरी यांची भाजप पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड
पुणे : भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ सदस्य राजाभाऊ जोरी यांची भारतीय जनता पक्ष पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते जोरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी अभिनंद केले. संघ परिवारातून घडलेले राजाभाऊ जोरी गेली चाळीस वर्षे पक्षात एकनिष्ठपणे काम करत आहेत. त्यांनी कोथरूड आणि खडकवासला मतदारसंघात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले.
कोथरूडमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच आरोग्य शिबिर, देवदर्शन यात्रा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, जेष्ठ व लहान मुलांचे मेळावे, महिलांसाठी होम मिनिस्टर यासह विविध कार्यक्रम तसेच शासनाच्या विविध समाज उपयोगी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि नव उद्योजकांना मार्गदर्शन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.