राष्ट्रीय

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काश्मीरी वेशभूषेत भारत जोडो यात्रेत सहभागी

जम्मू : काँग्रेसच्या माजी नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. भारत जोडो यात्रा ही द्वेषाच्या विरोधात असून प्रेम आणि सद्भावना पसरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे मी या यात्रेत सहभागी होत आहे, अशी प्रतिक्रिया एका व्हिडिओद्वारे उर्मिला मातोंडकर यांनी दिली. उर्मिला मातोंडकर यांचे सासर काश्मीरमध्ये आहे. आपल्या सासरी आल्यानंतर उर्मिला मातोंडकर कश्मीरी वेशभूषेत या यात्रेत दिसल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात असून लवकरच श्रीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. 

काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर

यावेळी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारीत करताना त्या म्हणाल्या की, “कडकडीत थंडीत मी आज जम्मूत आली आहे. आज राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. एक व्यक्ती, एक पक्ष आणि अनेक लोकांच्या सोबतीने ही यात्रा पुढे निघाली आहे. एक वेगळीचा ऊर्जा या यात्रेत सहभागी झालेल्यांना मिळाली आहे. त्यातूनच ही यात्रा पुढे जात राहिली. या ऊर्जेचे नाव आहे ‘भारतीयता’. खूप सारं प्रेम, बंधुता, स्नेह, विश्वास आणि सद्भावना यामध्ये आहे. हेच मूल्य आपल्या संपूर्ण देशाला जोडून ठेवते. त्याजोरावरच आपला देश इथपर्यंत आला आणि यापुढेही जाईल. मला वाटतं, जग प्रेम आणि सद्भावनेवर चालते. द्वेष आणि भीतीवर नाही. माझ्यासाठी या यात्रेचे महत्त्व राजकीय नसून सामाजिक आहे. सामाजिक मूल्यांवर चालणाऱ्या यात्रेत मी देखील सहभागी होत आहे. कारण भारतीयतेची ज्योत आपल्या हृदयात तेवत आहे, ती तशीच राहावी.”

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये