कोथरुड

दोन दिवसात बावधन व भुसारी कॉलनी मध्ये लसीकरण केंद्र सुरू होणार ; नगरसेवक किरण दगडे पाटील

बावधन : बावधन खुर्द मध्ये बेला विस्टा सोसायटी जवळ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व स्वातंत्र्य वीर सावरकर मैदान हॉल,उजवी भुसारी कॉलनी येथे येत्या दोन दिवसात कोरोना लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिली आहे. Vaccination centers will be started in Bawadhan and Bhusari colonies in two days;  Corporator Kiran Dagde Patil

बावधन व भुसारी कॉलनी परिसरात लसीकरण केंद्र नसल्याने येथील नागरीकांना लस घेण्यासाठी इतर केंद्रांवर जावे लागत होते. त्यामुळे बावधन व भुसारी कॉलनीत लसीकरण केंद्र सुरु व्हावे यासाठी आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो व या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून आता बावधान खुर्द व भुसारी कॉलनी मध्येही लसीकरण केंद्र सुरू होत असल्याने या भागातील नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर होणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी म्हंटले आहे.

परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन किरण दगडे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या परिसरातील नागरिकांनी लसीकरण नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
डेव्हिड कॅड – 9561372920
विकी कुंभार – 7219226041
प्रतिक वायकर – 7775877752
उमेश आढाव – 7499588931

Img 20210223 wa0156

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये