पुणे शहर

ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण; गरूड गणपती मंडळ आणि पुणे महापालिकेचा उपक्रम

पुणे : पुणे महापालिका आणि श्री गरुड गणपती मंडळ नारायण पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचे आयोजीत केले होते.या मार्फत आधाकरकार्ड – रेशनकार्ड आदी ओळखपत्र नसलेल्या बांधवांना मंडळाच्या वतीने लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी १०० नागरीकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली.

मेट्रोकामगार, फुगेविक्रेते आदी ओळखपत्र नसलेला लसीकरणापासुन वंचित असा घटक आपल्या परिचयाचा असल्यास यांना या योजने अंतर्गत मोफत लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी जरुर महापालिकेला सुचित करावे. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर, कार्याध्यक्ष कैलास कांबळे यांनी केले आहे.

Img 20210913 wa0011 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये