कोथरुड

देवाशिष फाऊंडेशनच्या गणेशमूर्ती दान या अभिनव उपक्रमास सुरूवात

कोथरूड : कांचन कुंबरे यांच्या “देवाशिष फाऊंडेशन” नामफलकाचे   अनावरण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गणेश मूर्ती दान या अभिनव उपक्रमास सुरूवात करण्यात आली.

देवाशिष फाउंडेशन याची स्थापना करण्यामागचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे “सामाजिक उपक्रम राबविणे महिलांचे आरोग्य , “महिला सक्षमीकरण व महिलांना आत्मनिर्भर” करणे हे आहे. देवाशिष फौंडेशन मार्फत आतापर्यंत “ती” च्या आरोग्यासाठी दर शुक्रवारी “लक्ष्मीनगर वसाहत’ डहाणूकर कॉलनी येथे महिला आरोग्यकेंद्र उभारले आहे तेही त्याची मोफत तपासणी केली जाते तसेच घरकाम करणाऱ्या, स्वछता साफसफाई करणाऱ्या महानगर पालिकेच्या महिलांना त्यांच्या आरोग्यसाठी सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप केलेले आहे. व ते अजूनही सुरुच आहे 

Img 20210913 wa0000

तसेच महिलांना लघु उद्योगासाठी योग्य असे मार्गदर्शन व प्रोत्सहन करणे, छोट्या छोट्या महिला बचत गटामार्फत महिलाना रोजगार उपलब्ध करून देणे हे आणि असे बरेच महिलांसोबत कार्यक्रम करणे हे देवाशिष फाऊन्डेशन चे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमास अभिनेता आरोह वेलणकर , वैभव मुरकुटे, सागर कडू , योगेश राजापूरकर , हरिभाऊ कुंबरे , रुपेश कुंबरे , त्रषिकेश कुंबरे इ. मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये