पुणे शहर

दिपाली धुमाळ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे लस उपलब्ध, पण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे लसीकरण नाहीच

पुणे : pune city वारजेतील गंगाबाई धुमाळ उद्यानातील लसीकरण केंद्रावर गेले पंधरा दिवस लस देण्यात न आल्याने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आज काही तासातच केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र लस उपलब्ध झाली तरी पालिका अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे लसीकरण होऊ शकले नाही. Vaccines available due to Deepali Dhumal’s aggressive stand ,but vaccination is not done because of administration wrong work

गेली पंधरा दिवस धुमाळ उद्यानातील लसीकरण केंद्रावर लस पाठवली जात नसल्याने आज दिपाली धुमाळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरानंतर क्षत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी इतर केंद्रावरून परत आलेल्या लसीच्या १० व्हाइल्स  व आवश्यक स्टाफ या केंद्रासाठी उपलब्ध करून दिला, मात्र ज्या ठिकाणी केंद्रासाठी सेशन तयार केले जातात त्या ठिकाणी या केंद्रासाठी सेशन मध्ये दुसरा डोस करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला. हे लसीकरण केंद्र सुरू होऊन ८५ दिवसही पूर्ण झाले नसताना दुसऱ्या डोससाठी ८५ दिवस न झालेल्यांची नोंद या ठिकाणी कशी होईल याचा साधा विचारही नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला नसल्याचे पहिला मिळाले. सुरवातीला लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी नागरिकांना बोलावण्यात आले पण सिस्टीम मध्ये दुसऱ्या डोससाठी लसीकरण असल्याने लसीकरणाला आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.

त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी पळापळ करून लस उपलब्ध करून केंद्र सुरू केल्यानंतर लसीचे शेसन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या गलथान कामामुळे या केंद्रावर आज लसीकरण होऊच शकले नाही.

Img 20210522 wa0204

याबाबत धुमाळ यांनी सांगितले की वास्तविक पाहता आज पालिकेच्या अशा चुकीच्या कारभारामुळे लसीकरण केंद्र सुरू न करण्याचीच भूमिका आपण शेवटी घेतली होती. पण अधिकाऱ्यांनी विनंती करून केंद्र सुरू केले पण जे व्हायचं ते झाले व पालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला. मुळात केंद्र सुरू होऊन ८५ दिवस झाले नसताना या  केंद्रासाठी दुसऱ्या डोससाठी सेशन कसे टाकण्यात आले. एवढी साधी गोष्ट अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या डोस साठी सेशन केले असते तर किमान लसीकरण तरी सुरू झाले असते याबाबत पालिका अधिकारी वैशाली जाधव यांना संपर्क केला मात्र द्यायला उत्तर नसल्याने त्यांचेकडून फोन उचलला जात नसल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये