भाजप कोथरूड दक्षिण मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विनोद मोहिते यांची निवड

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड दक्षिण मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विनोद मोहिते यांची आज निवड करण्यात आली आहे. दक्षिण मंडलाची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये ओबिसी मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
विनोद मोहिते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला नविन जबाबदारी दिली आहे. याचा मला आनंद होतो आहे. या नवीन जबाबदारी साठी मी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे विशेष आभार मानतो. आगामी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये कोथरूड तसेच पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे. संघटना म्हणून आम्ही निवडणूकीसाठी सज्ज आहोत.

भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड दक्षिण मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विनोद मोहिते यांची निवड करण्यात आली. युवा मोर्चा अध्यक्ष पदी ऋषी बराटे, महिला मोर्चा अध्यक्ष पदी अमृता देवगावकर यांची आणि इतर विभागाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली असल्याचे मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांनी जाहीर केले आहे.









