महाराष्ट्र
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात त्यांना अटक केली आहे. खार पोलिसांनी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक केली आहे.
किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण,हे शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात महाडेश्वर यांना अटक केली आहे.




