राष्ट्रीय

ओबीसी आरक्षण : नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकारने वेळ मागीतली

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने आता सर्वोच्च न्यायालयात यावर पुढील सुनावणी येत्या सोमवारी (दि. 25) होणार आहे.

ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शास्त्रीय इम्पिरिकल डाटा सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला सादर केलेल्या अहवालात अनेक चुका असून तो शास्त्रीय आधारावर नसल्याचे मत नोंदवून नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते. 

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी सरकारच्या वकिलाने नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.

Img 20220422 wa0084
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये