पुणे शहर

पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार ; या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार…

पुणे : पुणे शहरातील सर्व भागांत गुरुवार (दि. २०) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. २१) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे़. पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर, एस.एन.डी.टी./वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत व पंपिंग विषय तसेच बांधकामविषयक तातडीची दुरुस्तीची कामे करायची असल्याकारणाने २० मे रोजी संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.(Water supply to Pune will be cut off on Thursday; The water supply in this area will be cut off)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

Img 20210516 094854

भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा.

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग) : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड आदी सर्व भाग.

Screenshot 2021 05 12 21 44 03 43 1
Fb img 1620720024574

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये