पुणे शहर

चांदणी चौकातील उड्डाणपूल येत्या सोमवारी पाडणार; वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे : चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी अस्तित्त्वातील उड्डाणपूल पाडण्याचे काम १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. हा पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ सप्टेंबर रोजी पुलाची पाहणी केली आहे. त्यानुसार १२ सप्टेंबरपासून पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आहे. १५ सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

वाहतूक बदल

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरुड वारजेकडे जाणारी वाहतूक ही नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरून (क्रमांक १) वरून सोडण्यात येणार आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही उड्डाणपूल क्रमांक ३ मार्गे उड्डाणपूल क्रमांक ७ वरून सोडण्यात येणार आहे. पाषाण आणि अन्य मार्गांवरील वाहतूक ही पूर्वीप्रमाणेच असणार आहे.

मुंबई ते कोथरुड ही वाहतूक अस्तित्वातील कोथरुड मार्गे सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही.

कोथरूड ते मुंबई ही वाहतूक कोथरुड भुयारीमार्ग ते वेदविहार मार्गे असणार आहे.

कोथरुड ते सातारा, वारजे ही वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरील श्रृंगेरीमठाजवळून महामार्गावरून सातारा आणि वारजेकडे वळविण्यात येणार आहे.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये