कोथरुडपुणे शहर

सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त जाहीर समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

कोथरूड : जीवन विद्या मिशन अंतर्गत सद्गगुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त जाहीर समाज प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. राज सोसायटी गजानन महाराज मंदिराजवळ कोथरुड पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष गणेश शिंदे आणि मित्र परिवाराच्या सहकार्यातून या समाज प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्राला समर्पित अशा सर्व समाज बांधवांना प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची या विषयावर ज्येष्ठ प्रबोधनकार रमेश वाळुंज यांनी प्रबोधन केले. या कार्यक्रमाबरोबरच इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात आला. जीवन विद्या मिशन अंतर्गत ज्ञानसाधना केंद्र हनुमान नगर प्रमुख श्री ज्ञानेश्वर सपकाळ यांनी उपस्थितांचे आणि संयोजकांचे आभार मानले.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये