महाराष्ट्र

भावाला ओवाळण्यासाठी शुभ वेळ कोणती? भाऊबीजचे महत्त्व..

भाऊबीज ही भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज दिवशी यमद्वितीयाही असते. भाऊबीजेला भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. तिथे बहीण भावाचा सन्मान करून त्याला ओवाळते-औक्षण केलं जातं. त्यानंतर भाऊ बहिणीच्या घरी जेवतो. एकमेकांना सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात. भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ, यावर्षी भाऊबीज कधी आहे? भाऊबीज दिवशी यमद्वितीया का असते. भाऊबीज दिवशी औक्षण करण्याची शुभ वेळ? भाऊबीजचे महत्त्व काय?

Img 20231111 wa0004281292791598778819580777

वैदिक दिनदर्शिकेनुसार या वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:36 पासून सुरू होईल. ही तिथी बुधवार 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:47 पर्यंत वैध आहे. उदयतिथीच्या आधारे यंदा भाऊबीज बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल. पण, काही ठिकाणी 14 नोव्हेंबर रोजीही भाऊबीज साजरी केली जाईल.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

14 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करणार असल्यास औक्षण करण्यासाठी दुपारी 01:10 ते 03:19 ही वेळ शुभ राहील. तर 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज करणाऱ्यांसाठी औक्षणसाठी शुभ मुहूर्त सकाळी 10.40 ते दुपारी 12.00 पर्यंत आहे.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

15 नोव्हेंबर रोजी भाऊबीजच्या दिवशी अतिगंड योग आणि सुकर्म योग तयार होत आहेत. अतिगंड योग सकाळपासून दुपारी 12.08 पर्यंत आहे. तेव्हापासून सुकर्म योग तयार होत आहे, जो दिवसभर चालू राहतो

भाऊबीजेला यमद्वितीया असते. पौराणिक कथेनुसार, कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला मृत्यूचे देवता यमराज प्रथमच आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते. काही काळापूर्वी यमुनेने त्यांना सांगितलं होतं की, सर्व भाऊ बहिणीच्या घरी येतात आणि तू कधीच येत नाहीस. त्यावर यमराज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यमुनेच्या घरी आले.

Img 20231115 wa0004742783947379441426

तेव्हा यमुनेने यमराजाचे स्वागत केले. त्यावर यमराज खूप प्रसन्न झाले. त्याने बहिणीला वरदान मागायला सांगितलं. यावर यमुना म्हणाली की, कार्तिक शुक्ल द्वितीयेला जो भाऊ बहिणीच्या घरी जातो, त्याला यमाचे भय राहणार नाही. यावर यमराज म्हणाले की, जो भाऊ भाऊबीजच्या दिवशी बहिणीच्या घरी जातो त्याला मृत्यूची भीती उरणार नाही. भाऊबीज यमराजाशी संबंधित आहे, म्हणून याला यमद्वितीया असेही म्हणतात.

रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा सण बहिणी आणि भावांसाठी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण साजरा केल्याने भावाला अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. बहिणीला भावाच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा.

Fb img 17000291878124814644163179144643
Img 20231115 wa00138621016452628562099
Fb img 17000326826591907118224415651072
Fb img 17000318577816643438041201257658
Wp image2359977949390167627
Fb img 16997545332478063009632470005805
Img 20231112 wa00084245679956121736894
Fb img 17000247140246991620753376761607
Fb img 17000246622002037513342117675677
Img 20231115 wa00083092018559126034059
Img 20231112 wa00131228884357653556833
Img 20231114 wa00148879311630779914825
Wp image8585990092691348834
Digital 20231112 123519 00006696680381270481811
Img 20231112 wa0029506383627803066877
Img 20231112 wa00072576930588635310622
Img 20231112 wa00068214416706074968579
Img 20231112 wa00193038845121130085932
Img 20231111 wa00138990855750371916874
20231115 142027 00004786623222541936486

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये