गरजू मुलीला सायकल भेट ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणेची भाऊबीज भेट
पुणे: करोना काळात डोक्यावरील छत्र हरपले, आर्थिक आधार गेला, संकटाचे अनेक डोंगर समोर उभे टाकले, अशा वेळी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली. बालदीन व भाऊबीज चे औचित्य साधुन, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने आज ब्राह्मण गरीब मुलीला रोजच्या प्रवासासाठी नवीन सायकल भेट देऊन खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरी करण्यात आली.
या उपक्रमासाठी अनेक दानशूर हात पुढे आले, त्यांनी सायकल देण्याची जबाबदारी घेतली व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मार्फत ही मदत करण्यात आली.
या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद गिजरे, कोषाध्यक्ष कमलेश जोशी, शाखा अध्यक्ष राजीव देशपांडे, दत्तात्रय देशपांडे व नितीन फडणीस, सचिन वायकर, सरस्वती जोशी उपस्थित होते.
अनपेक्षिपणे व योग्य वेळी मिळालेल्या मदतीने कुलकर्णी कुटुंबाचे डोळे पाणावले व डॉ गोविंद कुलकर्णी यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विचारसरणीचे मनापासून आभार मानले.