देशविदेश

फेसबुक, व्हॉट्सॲप पुन्हा कधी सुरु होणार? अधिकृत माहिती जारी

मुंबई : जगभरात सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक डाऊन असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक डाऊन झाल्याने नेटीझन्सना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी कधी दूर होतील किंवा या सोशल मीडिया साईट्स पूर्ववत कधी होतील याबाबतची माहिती आता व्हॉट्सॲप आणि फेसबुककडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

व्हॉट्सॲप आणि फेसबुक ट्विटरवर नेमकं काय म्हणाले?
“काही लोकांना व्हाट्सॲप वापरताना अडचणी येत आहेत, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच व्हाट्सॲप पुन्हा आधीसारखं नॉर्मल सुरु होईल. त्याबाबतची माहिती लवकरच आम्ही तुला कळवू. आपल्या संयमाबद्दल धन्यवाद”, असं फेसबुक आणि व्हाट्सॲप टीमने ट्विटरवर सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये