पुणे शहर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार : चंद्रकांत पाटील

महासंघाच्या कॅलेंडर चे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे : pune अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठीचे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही उच्च तंत्र शिक्षण मंत्री chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांनी दिली.

समाज संघटित करत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प मोलाचा असल्याचे पाटील म्हणाले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या अनौपचारिक कार्यक्रम प्रसंगी त्यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Img 20231112 wa00053541767882370111537

यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, महासंघाचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , सरचिटणीस गणेश मापारी , युवक सरचिटणीस सचिन वडघुले , अनिकेत भगत उपाध्यक्ष सुधा पाटील, सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, कसबा अध्यक्ष वैशाली सोनवणे, पर्वती उपाध्यक्ष शुक्रा दुर्गे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20230717 wa0012281294586790481769091554

आम्ही समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोतच पण त्याच बरोबर रोजगार मेळावा, महिलांसाठी विविध स्पर्धा, उद्योजक मेळावा, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवत असल्याचे भाग्यश्री बोरकर यांनी यावेळी सांगितले.

Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये