पुणे शहर

मांजराच्या पिल्लाचा मारल्याने मृत्यू; महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : गोखलेनगर येथील (Pune) एका महिलेवर मांजराची हत्या केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ह्या महिलेचं नाव शिल्पा निळकंठ शिर्के (Nilkanth Shirke) असं आहे. ही महिला पुण्यातील गोखलेनगर (Gokhale Nagar, Pune) परिसरात राहते. चतुर्शिंगी पोलिसात ह्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील गोखले नगर ह्या परिसरात प्रशांत गाठे व शिल्पा शिर्के हे शेजारी राहतात. दरम्यान, प्रशांत गोठे यांनी पाळलेले चार महिन्यांचे मांजराचे पिल्लू शिल्पा शिर्के या महिलेच्या घरात शिरले असता शिल्पा यांनी मांजराच्या डोक्यात काठी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. ह्या प्रकरणी शिल्पा निळकंठ शिर्के ह्या महिलेवर विविध गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये