समाजमंदिराच्या जागेत महिलांना रोजगार निर्मिती चे प्रशिक्षण द्यावे – अर्चना पाटील

देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सात चाळीतील महिलांना आरोग्य किट वाटप व समाज मंदिरातील विकास कामांचे लोकार्पण
पुणे : वस्ती विभागात मनपाच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या समाजमंदिरांच्या हॉल मधे नगरसेवकांनी महिलांसाठी विविध कौशल्यविकास शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करावे जेणेकरून महिलांना रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल व महिला कुटुंबाला हातभार लावू शकतील असे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील म्हणाल्या.
नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून सात चाळ येथे साईबाबा मंदिरात बांधलेल्या हॉल चे व ग्रील व इतर कामांचे लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे सांगतानाच त्यांनी आरोग्य किट वाटप उपक्रमाचे कौतुक देखील केले.




महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस हे दूरदृष्टी असलेले नेते असून खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत असे शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. देवेंद्रजींच्या कार्यकाळात अनेक विकास योजना मार्गी लागल्या आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र प्रगतीपथावर गेल्याचे सांगतानाच स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवेंद्रजी असे ही सौ. खर्डेकर म्हणाल्या. देवेंद्रजी हे सातत्याने महिलांच्या साठी उपक्रम राबवावे असे सांगतात व त्यांच्या विकासाबद्दल बोलतात, म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वस्तीतील भगिनींना (सातचाळ, एरंडवणे मधील ) आरोग्य किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.






यावेळी भाजप महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील,पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,नगरसेवक जयंत भावे,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे,कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी,प्रभाग 13 चे अध्यक्ष राजेंद्र येडे,महिला मोर्चा सरचिटणीस कांचन कुंबरे,सरचिटणीस बाळासाहेब धनवे,एड. प्राची बगाटे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे, नितीन आपटे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे,जयश्री टेमघरे,वर्षा पाटील,मुकेश अनिवसे,अमोल डांगे,योगेश राजापूरकर, श्रीकांत गावडे, अपर्णाताई लोणारे,नारायण वायदंडे,अभिजित राऊत, प्रसन्न जोशी,ई उपस्थित होते.



कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका ही संभवतो म्हणून त्यासाठी ची सज्जता आवश्यक असून त्यासाठी महिलांना आरोग्य किट वाटप करत असल्याचे कार्यक्रमाच्या सह संयोजिका व भाजप महिला आघाडीच्या आय टी सेलच्या शहर संयोजक कल्याणी खर्डेकर म्हणाल्या. तसेच देवेंद्रजींच्या पुढील वाढदिवसा पर्यंत विविध वस्त्यांमध्ये महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्रोपचार शिबीर, स्तनांच्या कर्करोग तपासणी शिबीर यावर भर देणार असल्याचे ही सौ. कल्याणी खर्डेकर यांनी सांगितले.यावेळी दीपक पोटे,पुनीत जोशी,जयंत भावे आणि सौ. हर्षदा फरांदे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कल्याणी खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर अमित भिसे व सुरेखा पठारे यांनी संयोजन सहाय्य केले, सुरेखा पठारे यांनी आभार प्रदर्शन केले.


















