पुणे शहर

नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरु ; जून अखेर संपूर्ण काम पूर्ण होइल मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण.

पुणे : नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरु झाले असून मेट्रोचे काम ही पूर्णत्वास जात आहे. नळस्टॉप चौकातील समस्यांवर समाधान शोधण्यासाठी आणि येथील पुढील कामांचे नियोजन करण्यासाठी संदीप खर्डेकर आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने आज मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे,प्रकल्प अधिकारी मुलमुले,मनपा पथ विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे,मलनिस्सारण चे मुख्य अभियंता जगदीश खानोरे,पथ चे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे,उपअभियंता संदीप रणवरे,.कनिष्ठ अभियंता राजेश धुमाळ,कविता पाटील यांच्यासह विविध खात्यातील अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली.

मेट्रोचे काम जून अखेरपर्यंत वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.

१) मेट्रोच्या वतीने एस एन डी टी ते नळस्टॉप या पट्ट्यात ४ मीटर चा रस्ता,किमान २ मीटर कमाल ३ मीटरचा पदपथ करण्यात येणार आहे.
२) नळस्टॉप चौकात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत असून अनेक सोसायटीच्या आवारात यावर्षी पाणी घुसले.यावर मात करण्यासाठी कर्वे रस्त्यावर दोन्ही बाजूस ९०० मि.मी व्यासाची पावसाळी लाईन टाकण्यास मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
३) तर याच भागात ६०० मि.मी व्यासाची ड्रेनेज लाईन मनपा तर्फे टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली.
वरील कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील
४) मेट्रोचे काम पूर्णत्वास गेल्यावर संपूर्ण कर्वे रस्त्याचे डांबरीकरण पुणे मनपा तर्फे करण्यात येइल.
५) तसेच काम वेगाने करत जून अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे ही नियोजन करण्यात आले.

Img 20201114 wa0195

मात्र ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपे व्हावे यासाठी ठराविक अंतरावर डिव्हायडर च्या मधे क्रॉसिंग ठेवावे या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सूचनेवर *हे शक्य नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले व पौड फाटा ते खंडूजीबाबा चौक ह्या २:२ किमी च्या रस्त्यावर ५ सिग्नल चौकातून रस्ता ओलांडावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये