पुणे शहर

धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदरुस्ती आणि मानसिक शांतीसाठी योगा महत्वाचा.. कर्वेनगरमध्ये योग शिबिराचे आयोजन..

कर्वेनगर : जागतिक योग दिनाचे World Yoga Day औचित्य साधत कर्वेनगर मधील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल या ठिकाणी ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धिविनायक योग प्रसारक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य विनायक मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या योग शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत योगाभ्यासाचे धडे घेतले.

Img 20250622 wa01337192585633133519964

प्रसन्न आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या उपक्रमात प्रभागातील अनेक योगाचार्य, युवा, ज्येष्ठ नागरिक याचसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगामध्ये निपुणता प्राप्त योग खेळाडू यांनी उपस्थिती लावली. यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे स्वप्नील दुधाने उपस्थित होते.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

आज पर्यावरणीय समतोल बिघडत असताना धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदरुस्ती आणि मानसिक शांती दोहोंचे महत्व अनन्यसाधारण आहे. या दोन्हीचा यथायोग्य मिलाफ योगामध्ये होत असून निरोगी शरीर आणि मनासाठी योगा हा सर्वोत्तम मार्ग आहे. याचमुळे अधिकाधिक नागरिकांनी योगाचा स्वीकार करत आपले जीवन आनंददायी बनवावे, हीच अपेक्षा या शिबिरातून देण्याचा आमचा मानस आणि तो साध्य झाला असल्याचे आयोजक स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये