वारजेत गीत रामायण कार्यक्रमातील गीतांनी श्रोते भक्ती रसात तल्लीन..

वारजे : विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका दिपाली धुमाळ यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान व राजयोग प्रतिष्ठान आयोजित श्रीराम नवमी निमित्त ग.दी.मा. लिखीत गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सादर झालेल्या गीत रामायणातील गीतांनी वातावरण भक्तिमय झाले होते.
यावेळी माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष डी.के.जोशी, प्रमुख निवेदक प्रभाकर मांडके, गायक वसंतराव डोईफोडे, श्री कोरडे, संयोजक रत्नाकर लोणकर, अनिल कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी, जयंत मोहिते, अर्चना कोपरडे, आसाराम काजळकर, श्रीपाद कुलकर्णी, विठ्ठलराव जोशी, अंजली देशपांडे, अनुराधा प्रभुणे, मधुकर तयले आदी मान्यवर उपस्थित होते.










प्रभाकर मांडके यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर वसंतराव डोईफोडे यांनी गायन केले त्यांना श्री कोरडे यांनी तबल्यावर साथ दिली.
दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलें हा माझा सन्मान
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिने तेजाची आरती
सरयू – तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी
अशा सादर झालेल्या गीत रामायणातील गीतांनी श्रोते भक्ती रसात तल्लीन झाले.









