राष्ट्रीय
विरुष्का यांच्या घरी येणार नवा पाहुणा

विरुष्का यांच्या घरी आता नवीन पाहुणा येणार असून याबाबतची माहिती स्वतः भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहली याने ट्विटर वरून दिली आहे. अनुष्का हि गर्भवती असून तीला जानेवारी २०२१ मधील बाळंतपणाची तारीख दिली आहे. जानेवारी २१ पासून आम्ही तिघे असू असं विराटनं म्हटलं आहे. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा ११ डिसेंबर २०१७ रोजी विवाह झाला होता. विराट याने आज दिलेल्या गूड न्यूज नंतर या जोडीवर अभिनंदनाचा पाऊस पडू लागला आहे.



