पुणे शहर

‘ससून’मधील किरकोळ अडचणीमुळे बंद अवस्थेत ठेवलेले २१ व्हेंटिलेटर महापौरांच्या प्रयत्नातून सुरु

पुणे : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या वर्षी ‘पीएम केअर्स’च्या माध्यमातून ससून रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी २५ व्हेंटिलेटर बंद असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत करण्यात आला होता. मात्र या दाव्यानंतर आपण हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेतले आणि २५ पैकी २१ व्हेंटिलेटर सुरु करून घेतले आहेत. आता ही व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालय आणि ससूनमध्ये वापरण्यात येणार आहेत. संकट काळात २१ व्हेंटिलेटर रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाले आहेत. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मोहोळ म्हणाले, पंतप्रधान मोदीजी यांच्या पीएम केअर्समधून पुणे शहराला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ८० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर ससूनला दिले होते. त्यापैकी ३४ व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. त्यानंतर आपण तातडीने ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क करून महापालिकेच्या ताब्यात घेतले आणि हे व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यासाठी एका विशेष तंत्रज्ञच्या माध्यमातून व्हेंटिलेटर सुरू करण्यात यश आलं आहे

IMG 20210430 WA0001

महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकाचे अखत्यारीत असलेल्या ‘ससून’मधील व्हेंटिलेटर बंद असल्याची गंभीर माहिती समोर आल्यानंतर याची तातडीने दखल घेतली आणि हे व्हेंटीलेटर महापालिकेच्या ताब्यात घेऊन ते अवघ्या आठ दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र किरकोळ कारणांसाठी आताच्या काळात गरजेचे असलेले व्हेंटिलेटर मोठ्या संख्येने पूर्णपणे बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे.

दुरुस्त झालेल्या व्हेंटिलेटरपैकी ८ वेंटीलेटर ते बिबबेवाडी येथील रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले असून इतर व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिका आणि ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत. आताच्या काळात व्हेंटिलेटरची गरज असताना हे २१ व्हेंटिलेटर सुरू झाल्याने नक्कीच मोठा आधार मिळाला आहे. असेही मोहोळ यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close