पुणे शहर

महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्षपदी विजय डाकले..

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंती वर्षानिमित्त संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम व इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करण्याकरिता क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी विजय डाकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Vijay Dakle elected as Chairman of Krantiguru Lahuji Salve Memorial Committee of Maharashtra Government

ही निवड करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विजय डाकले यांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  त्यामध्ये संगमवाडी, जि. पुणे येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक विकसित करण्याच्या कामाचा समावेश करण्यात आलेला आहे.

यानुसार संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम व इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करण्यासाठी विभागाच्या अशासकीय सदस्यांसह सुधारीत समिती गठीत करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार समितीच्या अध्यक्ष पदी विजय डाकले यांची निवड करण्यात आली आहे. 

IMG 20210428 WA0187

तसेच सदस्यपदी राजू धडे, निलेश वाघमारे, शांतीलाल मिसाळ, रवि पाटोळे, बाळासाहेब भांडे यांची निवड करण्यात आली असून शासकीय सदस्य म्हणून विभागीय आयुक्त पुणे, पुणे महानगरपालिका आयुक्त, समाजकल्याण आयुक्त पुणे, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्यानुसार व
खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे,  माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून समाज एकत्रीकरणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर विजय डाकले यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close