पुणे शहर

३० मावळे आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन धावणार ; मोहिमेतील सर्वांचा किरण दगडे पाटील यांच्याकडून सन्मान..

पुणे :  औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराजांची आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक घटनेला १७ ऑगस्ट रोजी ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे पायदळ प्रमुख सरदार पिलाजी गोळे यांचे थेट वंशज ॲड. मारुती (आबा) गोळे व त्यांच्यासोबत 30 मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन धावणार आहेत. त्यांना या मोहिमेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

बावधन मधील सुर्यदत्त कॉलेजमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.  याप्रसंगी मा.पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे  उत्सवप्रमुख अमित गायकवाड, तहसिलदार मधुसूदन बर्गे, शिवशाहीर सौरभ करडे, सिंहगड अभ्यासक नंदकुमार मते, रिम कॉलेज चेअरमन सुरज शर्मा, शांताराम इंगवले माजी जि.प.सदस्य बापुसाहेब दगडे पाटील ,धनंजय दगडे पाटील, प्रभाग 10 अध्यक्ष सागर कडू, राजेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

Img 20210814 wa0146

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये