स्त्री शक्तीच्या सृजनोत्सवास मेहेंदी उपक्रमाने कोथरूडमध्ये सुरवात..

कोथरुड : pune city, kothrud भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व गायत्री भागवत मित्र परीवार यांच्या वतीने महिलांच्या करीता ” मोफत मेहंदी ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये २०० पेक्षा जास्त महिलांच्या हातावर मेहंदी काढून सृजनोत्सवास सुरुवात करण्यात आली .
श्रावण हा सृजनाचा महिमा गाणारा महिना. निसर्गासोबत फुलणारा आणि निसर्गाजवळ राहणाऱ्यांना सुखावणारा श्रावण खुप चैतन्यदायी भासतो. आनंद सणांचा आणि आनंद क्षणांचा एक निर्मळ महोत्सवच. नागपंचमी हा श्रावण मासातील पहीलाच सण स्त्री शक्तीचा हक्कांचा , मग तो जोरदार व चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे गायत्री भागवत यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रसाद राहुरकर, धनश्री हेंद्रे, क्रांती शाईवाले ,सिद्धार्थ पारखे, शुभम राहुरकर , प्रतिक यादव, नंदा नलावडे आदी उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजन भाजपा महीला आघाडी पुणे शहर सरचिटणीस गायत्री भागवत यांनी केले होते.




