कोथरुड

मोफत ॲक्युप्रेशर थेरेपी शिबीराचे दीवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन ; २८ ऑगस्ट पर्यंत चालणार शिबिर..

कोथरुड : Bodify Wellness आणि दीवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने रामबाग कॉलनी परिसरातील सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी  मोफत ॲक्युप्रेशर थेरेपी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. Free Acupressure Therapy Camp organized by Diwa Pratishthan;  The camp will run till August 28.

१६ ते २८ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या शिबिरात पहिल्या दिवशीच अनेक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराची अजय हेडगिरे, नायडू ताई, हर्षवर्धन मानकर वासुदेव आरे, शिरीष प्रभू, चंद्रहास शेट्टी, दिलीप देसाई, मयुर घोडके, दिलीप कानडे, गिरिजा, शिल्पा, भक्तीयोग, वणाराजी सोसायटी मधील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली. दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने या शिबिराचे संयोजन करण्यात आले आहे.

मधुमेह, स्पॉन्डिलाइटिस, थायरॉईड, स्नायूवेदना, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, व्हेरिकोजसायन, सांधेदुखी,  टाचदुखी, निद्रानाश, अर्धांगवायू, वजन वाढणे, वजन कमी होणे, हार्मोन्स प्रॉब्लेम, मासिक पाळीत होणारा त्रास अशा संबंधित कोणत्याही समस्या, अन्नपचन संबंधित समस्या मायग्रेन, साइटिका, पार्किन्सन या आजारांवर ॲक्युप्रेशर थेरेपी परिणामकारक आहे. त्यामुळे हे शिबिर नागरिकांसाठी लाभदायक असल्याचे हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले.

८ वर्षापुढील सर्वांसाठी हे शिबिर असणार असून
१६ ते २८ ऑगस्ट सकाळी दहा ते चार या वेळेत कोथरुड मधील रामबाग कॉलनी येथील गिरीजा सोसायटी हॉलमध्ये ते पार पडणार आहे. नोंदणीसाठी 9673647794, 9175072329, 8805151516 या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन दीवा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

Img 20210814 wa0146

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये