अर्थजगत

Hiranandani Group : आयकर विभागाचा हिरानंदानी ग्रुपवर छापा, बांधकाम क्षेत्रात खळबळ

मुंबई : आयकर विभागाकडून (Income tax department ) देशातील नामांकित असलेल्या हिरानंदानी ग्रुपवर (Hiranandani group) छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाकडून मुंबईमध्ये धाडसत्र सुरू आहे. सकाळी मुंबई, बंगळुरू, ठाण्यासह देशात एकूण 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. ठाण्यात हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर चोरी प्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. रियल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे पुणे, मुंबईतील बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्ट अप्स ग्रुपची कार्यालये आणि संबंधित जागांवर  प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 मार्च 2022 रोजी छापे घातले होते. ही कंपनी, बांधकाम साहित्याचा घाऊक आणि किरकोळ पुरवठा करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा देशभर वावर असून त्यांची वार्षिक उलाढाल 6000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या शोधमोहिमेदरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात एकूण 23 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये