अर्थजगत

PUNE : पुण्याच्या रेडिरेकनर दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

पुणे : पुण्याच्या रेडिरेकनर दरात सरासरी 6.12 टक्के वाढ करण्यात आली आहे. मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्याची मुंबई वगळता 5 टक्के इतकी रेडरेकनर दरात वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात 6.96 टक्के वाढ झाली आहे. या रेडिरेकनर दरामुळे नागरिकांना काही प्रमाणात तरी घर घेताना महागाईला सामोरे जावे लागणार, हे यातून स्पष्ट होत आहे.

पुण्यात सरासरी वाढ 6.12 टक्के, तर पुणे शहरात समाविष्ट 23 गावे 10.15 टक्के वाढ, पिंपरी चिंचवड शहरात 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे. यावेळी श्रावण हर्डीकर म्हणाले की, ग्रामीण भागात उपलब्ध खरेदी, विक्री व्यवहाराचा कल, परिसरात झालेला विकास, भूखंड विक्रीच्या जाहिराती, रिअल इस्टेट, वेबसाईट वरील माहिती इत्यादीच्या आधारे माहिती घेऊन सर्वसाधारण वाढ प्रस्तावित केलेली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये