आरोग्य
कोरोनाचा नवा XE व्हेरियंट

पुणे : महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्यानंतर आता XE नावाचा करोनाचा नवा व्हेरियंट हा ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरियंटपेक्षा दहा टक्के जास्त संक्रमणक्षम असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
नवीन XE हा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2. या दोन प्रकारातून म्युटेट होऊन तयार झाल्याचं म्हटलं जातं. XE रीकॉम्बिनंट हा व्हेरियंट सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला. तेव्हापासून या व्हेरियंटच्या 500 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. BA.2. च्या तुलनेत XE हा 10 टक्के जास्त वेगाने पसरतो, असं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे. याची खात्री करण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यास करणं गरजेचं आहे, असं WHO ने म्हटलं आहे.























































