पुणे शहर

कोरोना संकट संपल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहराच्या वतीने दगडूशेठ गणपतीची महाआरती..

पुणे : कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी दगडूशेठ हलवाई गणपतीला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहराच्या वतीने साकडे घालण्यात आले होते. आता हे संकट संपल्याने व सर्व निर्बंध उठल्याने जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहराच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

Img 20220403 wa0179

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यावरील कोरोनाचे संकट दुर झाले असून महाराष्ट्र राज्य आता कोरोना मुक्त होत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध उठवण्यात आल्याने समाजात पूर्वी सारखे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे इथुन पुढे कोणताही सण, उत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाना बंधने नसल्याने ते उत्साहात साजरे करता येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या या आनंददायी निर्णयाला बद्दल पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करुन नागरीकांना पेढे वाटप करण्यात आल्याचे किशोर कांबळे यांनी सांगितले.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये