कोथरुड काँग्रेसकडून चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा..

कोथरुड : कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केल्याने कोथरुडमध्ये कोथरुड काँग्रेसच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, कोथरूड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय खळदकर, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सभासद संदीप मोकाटे, किशोर मारणे, दत्ता जाधव, मनिषा करपे, राजू मगर, विशाल भेलके, संजय मानकर, बालाजी शिंदे, जीवन चाकणकर,मंगेश निम्हण, बाळासाहेब शेडगे,युवराज मदगे, समीर गांधी, शारदा वीर, नागेश चव्हाण, शिवाजी भोईटे, राज जाधव,
महेश विचारे, बंटी जाधव, विश्वास खवळे, गणेश गायकवाड, हरी सणस आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संदीप मोकाटे यांनी केले होते.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा केला तर चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले, हा विजय महाविकास आघाडीचा असून पुण्यातून कोल्हापूरला प्रचाराला कार्यकर्ते नेऊन काही उपयोग झाला नाही. कोल्हापूर मधील मतदारांनी भाजपला योग्य उत्तर दिले आहे.







