पुणे शहर

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन..

जनसंपर्क कार्यालय 24 तास नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार..

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या 24 तास नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणाऱ्या सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचे आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर , दिलीप कांबळे, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, बढेकर ग्रूपचे प्रवीण बढेकर, शहरातील भजपाचे माजी नगरसेवक, नगरसेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २४ तास हे कार्यालय नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणार असल्याने फडणवीस यांच्याकडून मोहोळ यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

राजकीय कार्यकर्त्याचे जनसंपर्क कार्यालय जनतेच्या समस्यांना निपटारा करणारे किंवा त्यांना जनतेशी संपर्क साधणारे केंद्र असते. पाच वर्ष शहर पातळीवर काम करीत असल्यामुळे परिपूर्ण जनसंपर्क कार्यालयाचे आवश्यकता आणखी तीव्रतेने जाणवली. नागरिकांशी संवाद साधणे, समस्या सोडवणे व जनतेला 24 तास सेवा उपलब्ध करून देणे यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

हे जनसंपर्क कार्यालय तयार झाले तेव्हापासूनच त्याची राजकीय वर्तुळात व नागरिकांमध्ये चर्चा होती. काम सुरू असताना बाहेरूनच कार्यालयाची सुसज्जता जाणवत होती. त्यामुळे २४ तास नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहणारे हे कार्यालय सुरू कधी होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानंतर आजपासून हे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.

Img 20220418 wa0006
Img 20220419 wa0007968353280963622575

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये