आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्तानात शाळेवर आत्मघातकी हल्ला; 25 मुलांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर करण्यात आलेल्या हल्लात 25 मुलांचा मृत्यू झाला आहे. शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काबूलमधील दश्त-ए-बरची भागात हा हल्ला झाला आहे. अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते.

काबूलच्या पश्चिमेला मुमताज ट्रेनिंग सेंटरजवळ हा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात किमान पाच जण जखमी झाले आहेत. गृह मंत्रालयाने अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटाची पुष्टी केली, गृह मंत्रालयाने यावेळी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे, याचा तपशील नंतर सार्वजनिक केला जाईल. अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये स्फोट झाले आणि आमच्या शिया बांधवांना लक्ष्य करण्यात आले, असे काबूल पोलिसांचे म्हणणे आहे.

Img 20220419 wa0026
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220418 wa0006

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये