पुणे शहर
“आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्या”; संजय राऊतांचं ट्वीट

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं म्हणत पुणे पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत यावर आपली भूमिका मांडली.
संजय राऊत म्हणाले, “ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.”




