कोथरूड मध्ये गणेश मुर्त्या बनवण्यात मुले दंग

दिवा प्रतिष्ठान व स्ट्रोक फांऊडेशनचा उपक्रम
कोथरूड : गणेशोत्सवाच्या औचित्य साधून दिवा प्रतिष्ठान व स्ट्रोक फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या श्री गणेश मुर्ती बनविण्याच्या मोफत प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबिरात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणेश मूर्ती तयार केल्या.
पर्यावरण पूरक उत्सवांना प्रोत्साहन मिळावे आणि बालविश्वाच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केल्याचे आयोजक दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याने मुलांमध्ये गणेश मूर्ती बनवताना उत्साहाचे वातावरण होते. आपल्या कलेचा कल्पकतेने वापर करत अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती या मुलांनी साकारल्या. बालविश्व उलगडताना, खुलताना बघून मनस्वी आनंद वाटला असे मानकर म्हणाले.






