अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या ABBM IDOL स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पौड रोड शाखा व कला संस्कृती आघाडीच्या वतीने आयोजन
कोथरुड :अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पौड रोड शाखा व कला संस्कृती आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या ABBM IDOL स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होत आपले कलागुण सादर केले.
या स्पर्धेत स्पर्धकांनी सावरकरांनी रचलेल्या जयोस्तुते गाण्यावर आधारित व्हायोलीन वादन, ओ सजना बरखा बहार आयी, जय शारदे बागेश्वरी, जाने कहां गये वो दिन अश्या मधुर गाण्यांची मेजवानी, आई विरहाने व्याकुळ झालेल्या मुलीच्या अभिनयाचे कसब, नजरेचे हावभाव दर्शवीत उत्कृष्ट पद्धतीने साकार झालेले नृत्य, संस्कृत व भाषण शैली, या सर्व सादरीकरणाला शंखवादनाने दिलेली दाद, माऊथ ऑर्गन, तबला, शिट्टी सुर, सिंथेसायझर यांचे उत्कृष्ट सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली.
या स्पर्धेचे परीक्षण, प्रसिद्ध सिने नाट्य कलाकार आनंद पानसे, संजय गोगटे, प्रसिद्ध गायिका माधवी दिवेकर, सत्यवान सावित्री या गाजलेल्या मालिकेतील सावित्री म्हणजे वेदांगी कुलकर्णी -तिळगूळकर, यांनी केले.
स्पर्धेचे विजेते पूढीलप्रमाणे..
▪️मधुरा फाटक – (नृत्य) प्रथम क्रमांक
▪️अनन्या जोगळेकर (गायन) – द्वितीय क्रमांक
▪️अनुराधा सोहोनी (गायन) – तृतीय क्रमांक
▪️विवेक वनगे (व्हायोलीन वादन) – उत्तेजनार्थ
▪️पल्लवी अनिखिंडी (गायन) – उत्तेजनार्थ
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे , वृषाली शेकदार, विजय शेकदार, सचिन टापरे, माधव तिळगूळकर, सुनील शिरगांवकर, राहुल जोशी, शैला सोमण, सौ ऋचा व अमोघ पाठक उपास्थित होते.

संघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन पौड शाखा अध्यक्ष विवेक खिरवडकर, उदय सुभेदार, रवींद्र रानडे, मंजुश्री खिरवडकर, सीमा रानडे, योगेश देव, चैतन्य देव, प्राजक्ता जोगळेकर,नीलिमा पानसे यांनी केले. दीपा केळकर यांनी निवेदन केले, प्रदीप रत्नपारखे यांनी आभार मांडले. कार्यक्रमाला अशोक प्रभुणे व माजी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.






